भोसरी मतदार संघात अफवांचे पीक; लांडे समर्थकांचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’!

भोसरीतील शिवसैनिक नाराज  आहेत, असा अपप्रचार करुन आपल्याला निवडणुकीत फायदा होईल, अशी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणाऱ्या अपक्ष उमेदवार विलास लांडे समर्थकांवर आता तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. कडवट शिवसैनिकांनी अफवा लक्षात येताच तात्काळ आपली भूमिका  जाहीर केली. ‘महायुती’चे  उमेदवार महेश लांडगे यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करीत अफवांचा समाचार घेतला आहे.

भोसरी विधानसभा निवडणुकीत ‘महायुती’चे उमेदवार महेश लांडगे आणि अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी आपआपल्या परीने प्रचार सुरू केला. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून भोसरीतील प्रचाराची दिशा बदललेली दिसत आहे. भोसरीतील शिवसैनिक महेश लांडगे यांच्यावर नाराज आहेत. त्यांना निवडणुकीत सहकार्य करणार नाहीत, अशी अफवा सोडवण्यात आली. त्याला लांडे समर्थकांनी ‘सोशल मीडिया’वर सोईस्करपणे ‘व्‍हायरल’ही करण्यात आले.

दरम्यान, अफवांची माहिती कळताच भोसरी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, संघटिका सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही शिवसैनिक ‘मातोश्री’हून आलेल्या आदेशाचे पाईक आहोत. गद्दारी आमच्या रक्तात नाही, अशी रोखठोक भूमिका अनेकांनी बोलून दाखवली आहे.

Loading...

त्यातच ‘महायुती’चे उमेदवार महेश लांडगे यांच्यावतीने आयोजित केलेल्या कोपरा सभांमध्ये इरफान सय्यद, सुलभा उबाळे, निलेश मुटके आदी नेते जाहीर भाषणांमध्ये प्रचार करीत आहेत. त्यामुळे ‘सोशल मीडियावर’ अफवांचे पीक वाढवणाऱ्या लांडे समर्थकांची चांगलीच अडचण झाल्याचे दिसत आहे.

याउलट, ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ अशी भूमिका ठेवून महेश लांडगे समर्थकांनी ‘सोशल मीडिया’वर  सोडवलेले प्रलंबित प्रश्न आणि भोसरी व्‍हीजन-२०२० अंतर्गत सुरू असलेले विकास प्रकल्प या मुद्यांवर प्रचाराचा धुरळा उडवल्याचे दिसत आहे.वास्तविक, बदलत्या राजकारणात मतदारांची अपेक्षा आणि भूमिकाही बदललेली आहे. उमेदवाराची मतदार संघात विकासकामे करण्याची धमक आणि दूरदृष्टी यावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे आजच्या विरोधी उमेदवाराविरोधात अफवा पसरवून स्वत:चे कर्तृत्च मोठे असल्याचा दिखावा करण्यापेक्षा, स्वत: काय केले आणि काय करु शकतो? याचा आलेख लोकांसमोर ठेवणे अपेक्षित आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

??जय भवानी जय शिवाजी ??फक्त आदेश

हेमंत उर्फ़ बाबुशेठ खराबे ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 14, 2019

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.