‘शक्तिमान’ भूमिकेतील मुकेश खन्ना यांच्या निधनाची पसरली अफवा

सध्या कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचं आणि भितीचं वातावरण आहे. अशातच अनेकांच्या निधनाच्या अफवांना पेव फुटत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. आता ‘शक्तीमान’च्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेले अभिनेते मुकेश खन्ना यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या जात आहेत.मात्र यावर आत्ता मुकेश खन्ना खूप संतापले आहेत.

अफवांवर आता खुद्द मुकेश यांनीच उत्तर दिलं आहे. “मी खरंच आता वैतागलो आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांना काय मिळतं? जवळपास माझ्या सर्व मित्रांनी आणि कुटुंबीयांनी मला फोन करून तब्येतीची विचारपूस केली,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवरही व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना विनंती केली. “माझी तब्येत ठीक आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांना पकडून मारलं पाहिजे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे मी एकदम ठणठणीत आहे,” असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं.

महत्वाच्या बातम्या 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा