साकीनाका प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा,आरोपीला फाशीच द्या; भाई जगताप आक्रमक

मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलीय. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या घृणास्पद कृत्याने मात्र सर्व सीमा ओलांडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणामुळे अख्खा देश हादरला होता. तशीच घटना मुंबईतील एका तरुणीसोबत घडली आहे.

मुंबईत एका महिलेसोबत नवी दिल्लीतील निर्भया प्रमाणे भयावह प्रकार घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही महिला ३२ वर्षांची आहे. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता उपचारादरम्यान, महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी मोहन चौहान (वय 45) याला घटनेनंतर अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जगताप म्हणाले कि, एक आरोपी पकडला आहे. मी पोलिसांशी बोललो. निर्भया प्रकरणासारखीच ही घटना घडली आहे. मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे. थोड्या कालावधीत एका आरोपीपर्यंत पोहोचलो. इतर आरोपीही पकडले जातील. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे. आरोपींना फाशीच झाली पाहिजे, असं  भाई जगताप म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा