धावपटू ललिता बाबरची मुलाच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

भारतीय महसुली सेवेत कार्यरत असलेले डॉ.संदीप भोसले आणि रिओ ऑलिम्पिकची फायनल गाठणारी मराठमोळी धावपटू ललिता बाबर या दाम्पत्याने आपल्या मुलाच्या म्हणजे रुद्रप्रताप ऊर्फ शंभुराजे याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० हजार रुपयांची मदत केली आहे.

कोरोनायोद्ध्यांचे मनोबल वाढवणार व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी केला शेअर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुद्रप्रतापला त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभाशिर्वाद दिले आहेत तसेच भोसले-बाबर दाम्पत्याने मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

Loading...

कोरोनाच्या उपचारासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, ‘बाबर यांनी राज्य आणि देशाचा नावलौकिक वाढवला असून संयम, शिस्त आणि मेहनतीच्याबळावर त्यांनी स्वत:च्या आयुष्यात यश संपादन केले आहे. आज अशाच संयम, शिस्त आणि समाजासाठीच्या समर्पणाची गरज आहे… एकजुटीने आपल्याला या संकटाचा मुकाबला करायचा आहे.’

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.