Rupali Chakankar | महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात 5 हजाराहून अधिक मुली गायब, रूपाली चाकणकरांनी दिली माहिती
Rupali Chakankar | मुंबई: महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था दोन्ही गोष्टी अत्यंत योग्य पद्धतीने पार पडत आहे, अशी माहिती सातत्याने शासनाकडून मिळत असते. अशा परिस्थितीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातून दररोज सरासरी 70 मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान राज्यातून 5510 मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून जानेवारी महिन्यात 1600 मुली गायब झाल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात 1810 तर एप्रिल महिन्यामध्ये 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या महिलांची संख्या वाढत चालली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या 16 महिन्यांपासून आम्ही सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत, असं रूपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या आहे.
लग्न, प्रेम आणि नोकरीत आमिष दाखवून मुलींची दिशाभूल केली जात आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार सुद्धा केले जातात. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे यासंदर्भात गृह विभागाने लवकरात लवकर पाऊल उचलावी, अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी केली आहे.
राज्यातील २२०० मुली मार्चमध्ये बेपत्ता; गृहविभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे.@Dev_Fadnavis @Maha_MahilaAyog@maharashtra_hmo @DGPMaharashtra pic.twitter.com/vr2QXqsXbX
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 7, 2023
मुली बेपत्ता होण्याच्या घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केलं आहे. हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.
सुप्रिया सुळे यांचं ट्विट (Supriya Sule’s tweet)
महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का? याबाबत… https://t.co/rAyNS5DCFI
— Supriya Sule (@supriya_sule) May 8, 2023
ग्रामीण भागातून अधिक प्रमाणात मुली गायब (More girls are missing from rural areas)
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातून मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण अधिक आहे. यामध्ये अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमधून अधिक प्रमाणात मुली गायब होत आहेत. मार्च महिन्याच्या आकडेवारीनुसार, पुण्यातून 2258, नाशिकमधून 161 कोल्हापूरमधून 144 ठण्यामधून 133, अहमदनगरमधून 101 आणि जळगाव मधून 81 मुली गायब झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी; सामना अग्रलेखातून पवारांवर टीकास्त्र
- Narendra Modi | “जगात कुठेही भारतीय अडकला तर झोप येत नाही” : नरेंद्र मोदी
- Weather Update | मोचा चक्रीवादळामुळे वातावरणात होणार मोठा बदल, जाणून घ्या
- Nana patole | …म्हणून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत नाना पटोलेंची भूमिका स्पष्ट
- Raj Thackeray – राज ठाकरेंनी सांगितले शरद पवारांचे राजीनामा मागे घेण्याचे खरं कारण
Comments are closed.