रुपाली चाकणकरांचा संभाजी भिडेंवर निशाणा, म्हणाल्या….

“तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्राच्या मातीत आहेत हे दुर्देव आहे. स्त्रियांच्या नादीही लागू नका, तुम्हाला जड जाईल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांना दिला आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे’; रुपाली चाकणकर यांची टीका

भिडे यांनी मुलं न होणाऱ्या महिलांचा उल्लेख ‘वांझ’ असा केला होता. त्यावरुन चाकणकर यांनी भिडे यांच्यावर टीकास्र सोडले आहे. “संभाजी भिडे स्ञीत्व, अस्तित्व, मातृत्व हि शब्द तुमच्यासाठी फार अनाकलनीय आहेत, पेलणार नाही तुम्हाला, उच्चारू नका आणि नादी ही लागू नका, जड जाईल,” असा टोला बोखडे यांनी ट्विटवरुन लागवला आहे.

संजय काकडे तुमचं भविष्याचं दुकान बंद करा – रुपाली चाकणकर

महिलांच्या मातृत्वावरुन वादग्रस्त वक्तव्य करणारी भिडेंसारखी माणसं महाराष्ट्राच्या मातीत आहेत हे दूर्देव असल्याचंही बोखडे म्हणाल्या आहेत. “आज तुम्ही मातृत्वाच्या सन्मानाला धक्का लावला आहे. तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्राच्या मातीत आहेत, हे दुर्दैव आहे,” असंही चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.