Rupali Patil-Thombare । “गुलाबरावांनी डुकरासारखे तोंड घेऊन..”; गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रुपाली ठोंबरेंची सडकून टीका
Rupali Patil-Thombare । मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेते गुलाबराव पाटील यांना त्यांच्या भागात जाऊन खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंवर जोरदार टीका केली. मात्र, यावेळी टीका करत असताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची जीभ घसरली. सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांचा उल्लेख त्यांनी ‘नटी’ म्हणून केला. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी गुलाबराव पाटील यांना चांगलंच सुनावलं आहे.
त्या म्हणाल्या, “आता आम्ही सुद्धा पातळी सोडून बोलणार आहे. गुलाबरावांनी डुकरासारखे तोंड घेऊन वचावचा बोलू नये. आपली पात्रता नाही आहे. सुषमा अंधारेंना ‘नटी’ म्हणत असचाल, तर तुमच्या घरातील ‘नट्या’ बाहेर आणा. त्यांना सुषमा अंधारेंच्या विरोधात मैदानात उतरण्यास सांगा,” असे आव्हान रुपाली पाटील यांनी दिलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रातील राजकारणाच्या संस्कृतीचे ईडी सरकारकडून धिंडवडे काढले जात असून, याचा प्रत्यय सातत्याने येत आहे.” त्याचबरोबर सुषमा अंधारेंचं भाषण आवडत नाही म्हणून ते करुन द्यायचं नाही. यासाठी पोलिसांचा दबाव टाकला जात असल्याचा आरोपही रुपाली पाटील यांनी केलाय.
“जबाबदार पदावर असताना महिलांविषयी ही भाषा वापरायची आणि मग माफी मागायची. खोट्या चौकश्या करून पुरुषांना संपवलं जात आहे. त्या पद्धतीने ईडी सरकारला महिलांना राजकारणातून संपवायचं आहे का?,” असा सवालही रुपाली पाटील यांनी केला आहे.
काय म्हणालेत गुलाबराव पाटील?
“सुषमा अंधारेंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा पिक्चर ( चित्रपट ) कुठेच चालला नाही, त्यामुळे त्या शिवसेनेत आल्या. ठाकरे गटालाही नटीची गरज होती. ज्याप्रमाणे एखादा पिक्चर काढण्यासाठी अभिनेत्रीची गरज असते, त्याप्रमाणे यांनाही ( ठाकरे गटाला ) एखादी बाई पाहिजे होती,” असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Upcoming Bikes Launch | भारतात लवकरच लाँच होतील ‘या’ बाईक
- Chandrakant patil | “माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर…”; सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- Andheri By Election | अंधेरी पोट निवडणुकीत नोटा दोन नंबरला; नेमकं कारण काय?, जाणून घ्या
- IND vs ZIM ICC T20 | भारताचे झिम्बाब्वेला १८७ धावांचे लक्ष; केएल राहुल आणि सुर्यकूमारचे अर्धशतके
- Anil Parab | नोटाला एवढी मतं का मिळाली? अनिल परबांनी दिलं उत्तर, म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.