Rupali Thombare | “अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली…”; रामदेव बाबांच्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या

Rupali Thombare | पुणे : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात रान पेटलेलं असताना योगगुरु बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी संताप व्यक्त केलाय.

त्या म्हणाल्या, महिलांनी काय घालायचं काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. हे विधान अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या समोर झालं आहे. अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे. महिलांनी साडी, सलवार घालणे इथपर्यंत ठिक आहे. ते मान्य आहे. पण पुढचं विधान कितपत योग्य आहे? रामदेव बाबा डोकं खाली आणि पाय वर करा. तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल, अशा शब्दात त्यांनी रामदेव बाबांना सुनावलं आहे.

रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही. त्यांचं हे विधान घाणेरडं आहे. या विधानाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. त्यामुळेच रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळं फसणार आहे, असा इशाराही रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे.

नेमकं घडलं काय?

ठाण्यामध्ये महिलांसाठी योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगा कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलनासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र दोन्ही कार्यक्रम सलग असल्याने महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. याबाबत बाबा रामदेव यांनी म्हटलं की साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही अडचण नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. पुढे रामदेव बाबा म्हणाले की, “महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.