Rupali Thombare | “जागे व्हा महाराष्ट्रातील लोकांनो! नाही तर…”, रुपाली ठोंबरेंच जनतेला आवाहन

Rupali Thombare | मुंबई : राज्यात मोठा मानला जाणारा ‘टाटा एअर बस’चा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यामुळे आता राज्यात वातावरण प्रचंड तापलेलं आहे. यावर राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं आहे.

महाराष्ट्रातील 4था प्रकल्प गुजरातला भाजप नेते चिडीचूप, पुणे मनपा सिक्युरिटीचे पगार 3,4 महिने देत नाही पुण्यातील भाजप चिडीचूप, भाजपने चंग केलाय ना रोजगार आणि ज्यांना आहे त्यांना ना पगारपाणी महाराष्ट्रातील भाजप केंद्रातील लाड पुरवता पुरवता महाराष्ट्रात भिकेला लावणारच, जागे व्हा, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यादरम्यान, विकासाच्या नावावर,खोट्या गुन्ह्याच्या धमक्या ,दबाव देऊन ,स्वतःचे नाकर्ते खापर दुसऱ्यावर फोडून आपल्या महाराष्ट्राला रीतसर भिकेला लावणार, मुंबईचे महत्व कमी करून महाराष्ट्र संपवण्याचा घाट वेळीस हाणून पाडला पहिजे, जागे व्हा महाराष्ट्रातील लोकांनो, असं आवाहन देखील ट्विटद्वारे दिलं आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार हे प्रकल्प तत्कालीन सराकमुळे गेल्याचा आरोप करत आहे. मग तीन महिने झाले हे सरकार गोट्या खेळण्यात व्यस्त होते का?. प्रकल्प गुजरातलाचं का जात आहेत. या भारत देशात दुसरे राज्य नाही का? गुजरात निवडणूक आली तर महाराष्ट्राला उपाशी ठेवून शिंदे-फडणवीस सरकार गुजरात्यांचे पोट भरत आहे का?, असे प्रश्न महाराष्ट्रातील नागरिक उपस्थित करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.