Rupali Thombare । “…तर चंद्रशेखर बावनकुळे यांच वासलेले तोंड बंद झालं असत”; रुपाली ठोंबरेंची सडकून टीका

(Rupali Thombare) मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून (Andheri East Election) भाजपने माघार घेतली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरेपर्यंत मोठे राजकारण पाहायला मिळाले. भाजपने माघार घेतल्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपवर टीकास्र सोडलं आहे.

“भाजपने अंधेरीपूर्व निवडणूक लढवली असती तर नागपूर पंचायत समिती नंतर अंधेरी पूर्व इथेही भाजपाचा दारुण पराभव झाला असता. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच वासलेले तोंड बंद झालं असत”, अशा शब्दात त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “पण तरीही दारुण पराभव दिसल्यानंतर भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी माघार घेतल्याबाबत त्यांच अभिनंदन”, असं म्हणत रुपाली ठोंबरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

“देवेंद्र फडणवीस यांचे अनेक पाताळयंत्री षडयंत्र पार करून धनगधगत्या खऱ्या मशालीची महाविकास आघाडीची व खऱ्या शिवसेनेची पहिली उमेदवार आमची भगिनी ऋतुजा लटके ताई आमदार होईल यांचा आनंद आहे . पण ताईंनी मतदान होईपर्यत प्रचार चालू ठेवावा , निकाल लागेपर्यंत सावध भूमिका घ्यावी”, असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडणं, हे कुणाच्या बापाची जहागिरी नाही. तुम्हाला या जन्मात नव्हे तर पुढच्या सात जन्मातही घड्याळ बंद पाडणं शक्य नाही, अशी टीका रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. हिटलरशाही आणि दबाब यंत्रणांचा आधार न घेता मैदानात या, राज्यातील जनता भाजपाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंही त्या म्हणाल्या. रुपाली ठोंबरे यांच्या या टीकेला भाजपकडून काय उत्तर येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.