Rupali Thombre | चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानाला रुपाली ठोंबरे पाटलांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

मुंबई : राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सत्ताधरी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते सतत एकमेकांवर आरोप, टीका करताना आपल्याला दिसून येतं असेल. भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडू, याची सुरुवात बारामतीतून करावी लागेल,असं वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे पाटील ?

राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडणं, हे कुणाच्या बापाची जहागिरी नाही. तुम्हाला या जन्मात नव्हे तर पुढच्या सात जन्मातही घड्याळ बंद पाडणं शक्य नाही, असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. हिटलरशाही आणि दबाब यंत्रणांचा आधार न घेता मैदानात या, राज्यातील जनता भाजपाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच यासंबंधी त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेभाऊ, आपण जी वक्तव्य करत आहात की, राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की, राष्ट्रवादीचं घड्याळ थांबवणं किंवा बंद पाडणं हे कुणाच्याच बापाची जहागिरी नाही. हिटलरशाहीने आणि यंत्रणेचा दबाव आणून तुम्ही आमच्यातील काही लोक फोडून सत्तेवर आला आहात, म्हणून तुमचा आत्मविश्वास वाढला आहे. पण सगळेच गद्दार नसतात, हे नीट लक्षात ठेवा.

सगळेच हिटलरशाहीच्या दबावाला बळी पडणारे नसतात. काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळासारखे खंबीर कार्यकर्ते आणि नेतृत्व करणारे मावळेही असतात. त्यामुळे तुम्हाला या जन्मात आणि पुढच्या सात जन्मातही घड्याळ बंद पाडणं शक्य नाही. याउलट तुम्ही हिटलरशाही, दबंगगिरी आणि यंत्रणेद्वारे दबाव आणणं बंद करून मैदानात या… नक्कीच जनता भाजपाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सांगते, राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडणं, ही कुणाच्याच बापाची जहागिरी नाही. तुम्ही कधीही घड्याळ बंद पाडू शकत नाही. यामध्ये तुमचाच नायनाट होईल, एवढं लक्षात असू द्या” अशा शब्दांत रुपाली ठोंबरे पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.