कोविन अ‍ॅपवर आता रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचा पर्याय उपलब्ध!

भारतात गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. त्यामुळे ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोविशील्ड’ लसीनंतर सरकारने ‘स्पुटनिक व्ही’ या तिसऱ्या लशीला परवानगी दिली आहे. ‘स्पुटनिक व्ही’ लशींच्या दोन खेप भारतात पोहोचल्या असून रशियन बनावटीची पहिली लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटीजच्या सदस्याने घेतली. आता या लसीचा पर्याय कोविन पोर्टलवर दिसू लागला आहे. त्यामुळे आता नागरिकांना तीन पर्याय उपलब्ध झाले आहेत.

‘कोविन अ‍ॅप’वरून स्लॉट बुक करताना पिनकोड टाकून ऑप्शन सर्च करण्याचा पर्याय आहे. ‘स्पुटनिक व्ही’ लसीवर क्लिक केल्यास आपल्याला त्याच्याशी निगडीत रुग्णालयांची यादी समोर दिसेल.

‘स्पुटनिक व्ही’ लसीचा एक डोस ९४८ रुपयांना उपलब्ध असणार आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने एकूण किंमत ९९५ रुपये ४० पैसे इतकी असेल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही रशियन बनावटीची लस भारतात सरासरी हजार रुपयांना उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

रशियामधून ‘स्पुटनिक व्ही’ लसीचा पहिला साठा हा १ मे रोजी भरतात दाखल झाला. स्थानिक औषध प्रशासनाने त्याला १३ मे रोजी मान्यता दिली आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा