Ruturaj Gaikwad | चैन्नई: आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) मंगळवारी (23 मे) आमने-सामने आले होते. या सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनीचा नेतृत्वाखाली चेन्नईने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत चेन्नईने 20 षटकांमध्ये 7 गडी गमावून 172 धावा केल्या होत्या. यामध्ये ऋतुराज गायकवाडने 44 चेंडू मध्ये 60 धावांची खेळी खेळली. यानंतर ऋतुराज गायकवाडने विराट कोहली ( Virat Kohli) चा एक खास विक्रम मोडला आहे.
Rituraj Gaikwad broke Virat Kohli’s ‘this’ record
गुजरात विरुद्ध चेन्नईने आतापर्यंत चार सामने खेळले आहे. या सर्व सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) ने अर्धशतक ठोकले आहे. गुजरातविरुद्धच्या चार सामन्यांमध्ये गायकवाडने 69.5 च्या सरासरीने आणि 145.5 च्या स्ट्राईक रेटने 287 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे विराट कोहलीने गुजरात विरुद्ध तीन सामन्यात 166 धावा केल्या आहेत.
ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) ने आणि विराट कोहलीपेक्षा गुजरातविरुद्ध जास्त धावा केल्या आहे. आयपीएल 2023 चा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यामध्ये गुजरातने चेन्नईला पराभूत केले होते. मात्र, या सामन्यामध्ये 92 धावांची खेळी खेळत ऋतुराजने सर्वांची मनं जिंकली होती.
दरम्यान, चेन्नईविरुद्ध पहिला क्वालिफायर सामना हरल्यानंतर गुजरातला अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. गुजरात आपला दुसरा क्वालिफायर सामना 26 मे रोजी शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Bachchu Kadu | आमदार बच्चू कडू यांना मिळाला ‘या’ मंत्रीपदाचा दर्जा
- Weather Update | कुठे ऊन तर कुठे पावसाचा इशारा, पाहा हवामान अंदाज
- IPL 2023 LSG vs MI | एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ‘या’ तारखेला असणार आमनेसामने
- Hasya Jatra Dattu More | “जस्ट मॅरीड” असं कॅप्शन देत दत्तू मोरेचे पत्नीसह प्री वेडिंग फोटोशूट
- Ajit Pawar | त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवायची परंपरा आहे की नाही? अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MuTnmv