Saamana | सामनाच्या पहिल्याच पानावर खोके सरकारची जाहीरात, राजकीय चर्चांना उधाण

Saamana | मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारकांना धारेवर धरलं होतं. राज्यातील सरकार हे ५० खोके घेऊन सत्तेत आलेलं सरकार असल्याचा आरोप करत राज्य सरकारला खोके सरकार असं नाव देखील विरोधकांनी दिलं आहे. असातच याच खोके सरकारची जाहिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या सामना (saamana) वृत्तपत्रात पहिल्याच पानावर झापण्यात आली आहे. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

स्वातंत्र्याची 75 वर्ष… एका वर्षात 75,000 रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प. पहिल्या टप्प्यातील नियुक्ती प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम, असा या जाहिरातीवर मजकूर लिहिण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महासंकल्प कार्यक्रमाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित करणार असल्याचा या जाहिरातीत उल्लेख आहे.

यादरम्यान, प्रमुख उपस्थितांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांची नावे आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचंही नाव आहे.

या जाहिरातीत सर्वात वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. तर जाहिरातीच्या मध्ये एकनाथ शिंदा आणि देवेंद्र फडणवीस यांचा नियुक्तीपत्रांचं वाटप करतानाचा फोटो आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.