Saamana | सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला हल्ला

Saamana | मुंबई : राज्यातील राजकीय वातावारण खूपच गढूळ होत चाललं आहे. सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Thackeray) गटाचे मुखपत्र सामना (Saamana) या वृत्तपत्रातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

काय म्हटलं आहे सामना (Saamana) अग्रलेखात

शिवसेना राहता कामा नये आणि शिवसेनेतून जे विष बाहेर पडलंय त्या विषाला बासुंदीचा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरु आहे, त्यामुळं कटुतेची धार कशी कमी होणार? शिवसेनेतील काही लोक लाचार आणि मिंधे केल्यानं सत्ता मिळाली, पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले?, असा खोचक सवाल सामना अग्रलेखातून फडवीस यांना केला आहे.

उद्या काय होईल असे जर तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपवण्याचा विडा उचलाच! लागा कामाला.

2019 साली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून भाजप आणि शिवसेनेत कटुता निर्माण झाली. ही कटुता अतिशय टोकाला गेली आहे. शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे काही नेते तुरुंगात गेले आहेत. त्यामुळंच सामनातून असा अग्रलेख छापण्यात आला असावा अशी चर्चा देखील रंगली आहे. तसेच, खरी शिवसेना कोणती हे फडणवीसांना पक्के माहित आहे. त्यांनी गळ्यात जो खरी शिवसेना म्हणून धोंडा बांधून घेतला आहे, तो महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे. हे समजण्याइतके फडणवीस सुज्ञ आहेत. गेल्यावेळी भाजपने शब्द पाळला असता तर तेच आज वर्षावर असते, आणि आम्ही एका नात्याने त्यांच्याकडे फराळास गेलो असतो, असल्याचं सामनामध्ये सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.