InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘ज्या चुका केल्या त्या चुका विरोधी पक्षनेते असताना करू नका’; सामनामधून देवेंद्र फडणवीस यांना सल्ला

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चुका केल्या त्या निदान विरोधी पक्षनेते म्हणून तरी करु नयेत, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. विरोधी पक्षनेतेपदाची शान व प्रतिष्ठा राहावी, अशी आमची इच्छा आहे. खरं तर भाजपचा हा अंतर्गत मामला आहे की, कुणाला विरोधी पक्षनेते करायचे किंवा कुणाला आणखी काय करायचे, पण राजस्थानमध्ये भाजपने वसुंधराराजे शिंदेंना किंवा मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना विरोधी पक्षनेते केलं नाही. महाराष्ट्रात मात्र दिल्लीवाले फडणवीस एके फडणवीस करत आहेत, यामागचं रहस्य समजून घ्यावं लागेल, असं सामनाच्या अग्रलेखात छापून आलं आहे.

बहुमताच्या आसपासही जाणं शक्य नसताना दिल्लीने फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली आणि ते सरकार कोसळल्यावर पुन्हा फडणवीस यांनाच विरोधी पक्षनेता केलं. महाराष्ट्राच्या जनेतला भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वातही बदल हवा होता, त्याचं प्रतिबिंब मतदानात दिसलं, पण तरीही भाजप नेतृत्वाने फडणवीस यांनाच विरोधी पक्षनेतेपदी नेमलं. ही त्यांची पक्षांतर्गत बाब असल्यामुळे आम्ही फार काही बोलणार नाही, असं संजय राऊत सामनाच्या अग्रलेखात म्हणाले आहेत.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.