Sachin Kharat | … म्हणून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण परत करावा; सचिन खरात यांची मागणी
Sachin Kharat | मुंबई : सध्या खारघर प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari ) यांना रविवारी (16एप्रिल) नवी मुंबई येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमासाठी लाखो श्री सदस्यांनी उपस्थिती लावली होती. परंतु त्या दिवशी प्रचंड उष्ण तापमान असल्याने अनेक नागरिकांना उष्माघाताचा सामना करावा लागला. यापैकी काहींचा मृत्यू झाला. तर कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली, मात्र कारण उष्माघाताचं सांगण्यात आलं, असा आरोपही विरोधकांनी केला होता. यावरून हा सध्या महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. तर याआधी श्री सदस्यांच्या मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) या प्ररकणात नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आता अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी मागणी केली आहे.
काय म्हणाले सचिन खरात? (What did Sachin Kharat say)
सचिन खरात म्हणाले, ‘ महाराष्ट्र राज्यातर्फे देण्यात येणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार यावर्षी जाणीवपूर्वक आरएसएस या संघटनेचे कट्टर समर्थक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला आहे. परंतु पुरस्कार प्रदान करताना उष्माघातामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला हे अत्यंत निंदनीय आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आम्ही आठवण करून देत आहे की, ज्यावेळेस ज्येष्ठ मराठी अभिनेते निळू फुले यांना माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी फोन करून सांगितले होते की आपल्याला महाराष्ट्रभूषण पुरस्कारसाठी आपली निवड केली आहे. त्यावेळेस निळू फुले मुख्यमंत्र्यांना म्हणाले, मी या पुरस्कारासाठी पात्र होण्यास कोणत्याही पराक्रम केला नाही.. उलट पोटापाण्याची सोय म्हणून मी अभिनय करतो आणि माझ्यामुळे समाजाला कोणताही फायदा झाला नाही. यामुळे अशा माणसाला पुरस्कार द्यावा जो समाजासाठी काम करतो याची आठवण ठेवून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा.
असं सचिन खरात म्हणाले.
दरम्यान, सरकारकडून देखील खारघरच्या या कार्यक्रमादरम्यान मृत्यू पावलेल्या व्यक्तींना मदत केली आहे. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली असली तरी, पैसे देऊन आमची माणसे परत येणार आहेत का? असा टाहो मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत कळव्यातील देखील दोन महिलांचा समावेश आहे. मृतक आईंच्या मुलींनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या आईचा जीव गेला असल्याचा आरोप मृतक महिलांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. या प्रकरणामूळे वाद पेटला असून सरकारला प्रश्न विचारला जातं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- IPL 2023 | दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू स्पर्धेतून बाहेर
- Job Opportunity | डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्समार्फत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपासून करा अर्ज
- Sanjay Raut । “महाराष्ट्रात मोगलाई सुरू आहे का?” : संजय राऊत
- Dark Circles | डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी एरंडेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- AIIMS Recruitment | ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Comments are closed.