“सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये येतील, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय”

जयपूर : उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करून मोठा धक्का दिला. त्यांच्या आधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जोतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आता राजस्थानमधील नाराज नेते सचिन पायलट यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने याबाबत दावा केला आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहे.

यानंतर आता सचिन पायलटदेखील पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे. पायलट लवकरच भाजपमध्ये येतील. माझं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे, असा दावा नुकत्याच भाजपत प्रवेश केलेल्या रिटा बहुगुणा जोशींनी केला आहे. त्यानंतर मात्र दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या झोपी उडाल्या आहेत. राहुल गांधींचे निकटवर्तीय हळूहळू पक्ष सोडून जात असल्यानं आता काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा