“सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये येतील, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय”

जयपूर : राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे जितिन प्रसाद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यात सचिन पायलटदेखील पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे. पायलट लवकरच भाजपमध्ये येतील. माझं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे, असा दावा नुकत्याच भाजपत प्रवेश केलेल्या रिटा बहुगुणा जोशींनी केला आहे.

राजस्थानचे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पक्षश्रेष्ठींना अल्टिमेटम दिला आहे. जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार आणि राजकीय नियुक्त्या करण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय घेण्यास आम्ही स्वतंत्र आहोत, असा अल्टिमेटम त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना दिला आहे. गेले दोन दिवस राजस्थानात सत्तांतर होण्याच्या चर्चेला वेग आला आहे. त्याचबरोबर बैठकांचं सत्र चालू झालं आहे.

त्यानंतर मात्र दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या झोपी उडाल्या आहेत. राहुल गांधींचे निकटवर्तीय हळूहळू पक्ष सोडून जात असल्यानं आता काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा