InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

ज्युनियर एशियन चॅम्पियनशीपमध्ये कुस्तीपटू सचिन राठी आणि दिपक पुनियाला सुवर्ण पदक

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियनशीपमध्ये भारतीय कुस्तीपटू सचिन राठी आणि दिपक पुनियाने सुवर्ण पदक जिंकले आहे.

74 किलो वजनी गटात राठीने मंगोलियाच्या बॅट-इरडेने ब्यमासुरेनला पराभूत केले. याच गटात सुशील कुमारही खेळतो. राठीने मागच्याच वर्षी वरिष्ठ गटातून पदार्पण केले होते. त्यावेळी मात्र तो पराभूत झाला होता.

“एका क्षणी मी या सामन्यात मागे राहिलो होतो पण मला या विजयाबाबत खात्री होती. उपांत्यफेरीचा सामना तर या ही पेक्षा अवघड होता पण तो सामना मी जिंकलो म्हणूनच मी हा सामना जिंकून चॅम्पियन होणार हे मला माहिती होते”, असे राठी म्हणाला.

राठीबरोबरच पुनियाने 86 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. पुनियाने तुर्कमेनीस्तानच्या अझत ग्याययेवला पराभूत केले. त्याने मागच्या वर्षी याच स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

सुरज कोकाटे याने 61 किलो वजनी गटात जपानच्या युटो सुचिया, मोहित ग्रेवालने 124 किलो वजनी गटात मंगोलियाच्या बॅट-इरडेने इरडेनेबातरला आणि करणने 65 किलो वजनी गटात तुर्कमेनीस्तानच्या पेरमॅन होम्माडोवला पराभूत करत कांस्य पदक पटकावले.

महत्त्वाच्या बातम्या-

एकही धाव आणि एकही विकेट न घेता कसोटी सामना जिंकणारा तो ठरला १२ वा कर्णधार

टीम इंडियाच्या खेळाडूंना पुढील एक महिन्यासाठी रहावे लागणार पत्नीपासून दूर?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.