Sachin Sawant | “भाजपाच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन आहेत”; सचिन सावंत असं का म्हणाले?

Sachin Sawant | नागपूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरमध्ये बोलताना मोठं विधान केलं. “मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असं ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवरच काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

ते म्हणाले, “राक्षसी सत्ताकांक्षा असलेल्या भाजपाच्या पोटातील ओठांवर आले आहे. मुख्यमंत्रीपदाचा आम्हाला सन्मान आहे पण खेदाने सांगावेसे वाटते की भाजपा नेत्यांकडून सतत येणारी विधाने पाहिली तर भाजपाच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन आहेत. ही तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था आहे.”

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमल मिटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. “चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा अर्थ सोपा आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी एक सभेत सांगितलं होतं, की देवेंद्र फडणवीस आमचे खरे मुख्यमंत्री आहेत आणि बावनकुळेंचं वक्तव्य समोर आलं आहे. तसेच स्वत: एकनाथ शिंदेंचं काही दिवसांपूर्वी बोलले होते की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस. याचा अर्थ स्पष्ट आहे , एकनाथ शिंदे आणि शिंदे गट हा भाजपाला शरण गेला आहे,” असं अमोल मिटकरी म्हणाले.

पुढे ते म्हणले, “भाजपाच्या मनात जे आहे की देवेंद्र फडणवीसांनीच नेतृत्व करावं, याचा अर्थ ते एकनाथ शिंदेंना कवडीचीही किंमत देत नाहीत. चंद्रशेखऱ बावनकुळेंचं वक्तव्याचा गांभीर्याने विचार शिंदे गटाने आणि महाराष्ट्राने केला पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.