Sachin Sawant | “भाजपाने चीनच्या शी जिनपिंग यांचा आदर्श घेतला का?” ; सचिन सावंत असं का म्हणाले?

Sachin Sawant | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला असताना पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात झाई गावात गुजरात राज्याने घुसखोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत, ‘भाजपाने चीनच्या शी जिनपिंग यांचा आदर्श घेतला का?, असा सवाल केला आहे. तलासरी तालुक्यात वेवजीप्रमाणेच झाई गावात गुजरात राज्याने ३० वर्षांपूर्वी घुसखोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील ग्रामपंचायतीने झाईतील ३६ पैकी ३४ कुटुंबांना तीन लाख रुपये आणि घरपट्टीचे प्रलोभन दाखवून गुजरातेत समाविष्ट करवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित दोन कुटुंबांनी त्यास नकार दिल्याने गुजरातमधील सरकारी यंत्रणांनी कारवाईच्या नोटिसा पाठवल्याने खळबळ उडाली आहे.

 

या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी भाजपाच्या कर्नाटक सरकारनंतर आता गुजरात सरकारही पुढे! महाराष्ट्राबाबत एवढा आकस का? शिंदे फडणवीस सरकार कधीपर्यंत गप्प बसणार?, असे सवाल केले आहेत.

दरम्यान, तलासरी तालुक्यातील झाई गावापासून गुजरातमधील उंबरगाव तालुक्यातील गोवाडा ग्रामपंचायतीची हद्द १५० ते २०० मीटर अंतरावर आहे. या दोन गावांमध्ये एक पूल आहे. मात्र, सीमादर्शक दगड खाजन जमिनीतील चिखलात गाडला गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.