Sachin Sawant | “राज ठाकरेंना महाराज कळले असते तर…”; काँग्रेसचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या निमित्ताने  मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरील एक प्रसंग सांगत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा साक्षात्कार झाल्याचं सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच यावर काँग्रेस पक्षाचे नेते सचिन सावंत यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

सचिन सावंत यांची प्रतिक्रिया!

शिवाजी महाराज महाराष्ट्राला समजण्याची इच्छा ‌व्यक्त करण्याआधी राज ठाकरे यांना महाराज कळले असते तर सतत भूमिका बदलल्या नसत्या आणि भोंगे शोधले नसते. खरोखरच महाराज त्यांना कळावे ही सदिच्छा, असं म्हणत सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यामध्ये सचिन सावंत म्हणाले, “राज ठाकरे यांच्यावर लगे रहो मुन्नाभाई किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. पाठीवर हात ठेवने, चोक होणे, साक्षात्कार वगैरे. एखाद्या चित्रपट 30-32 वेळा पाहण्याची सवय आहेच.”

राज ठाकरे यांनी सांगितलेला प्रसंग

दरम्यान, 1994 सालची ही गोष्ट आहे. मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. डायरीत शिवजयंतीचे कार्यक्रम लिहिले होते. सामनाचे बाजीराव दांगट आणि त्यांचे भाऊ माझ्याकडे आले. बाळासाहेब फार वर्षांपूर्वी शिवनेरीला आले होते. त्यानंतर ठाकरे घराण्यातील कोणी आलेलं नाही, तर तुम्ही या असा आग्रह त्यांनी केला. मी त्यांना व्यस्त असल्याचं सांगत डायरी दाखवत होतो. माझे सगळे कार्यक्रम आखले असल्याने शक्य नाही असं मी त्यांनी सांगत होतो. रात्री मी घरी आल्यानंतर काय झालं माहिती नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयात आलो, सर्व कार्यक्रम रद्द केले आणि तिथे शिवनेरी असं लिहिलं. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मी जुन्नरला गेलो. सकाळी 4 वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली. गडावरील एका खोलीत गेल्यानंतर भिंतीवर कोणीतरी हळद आणि कुंकू टाकलं होतं, त्याकडे पाहत होतो. तितक्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि “इथेच शिवाजी महाराजांचा जन्म झाला” असं सांगितलं. मी मागे वळून पाहिलं असता कुणीच नव्हतं. मी काही वेळ एकाच जागी स्तब्ध झालो. यानंतर मी किल्ल्यावरून खाली आलो. डोक्यावर पाण्याच्या बाटल्या ओतल्या आणि शांत बसून राहिलो. त्यानंतर मी गड उतरण्यास सुरुवात केली. त्या घटनेनंतर मी तीन ते चार वेळ शिवनेरीला गेलो, पण पुन्हा असं झालं नाही, असा प्रसंग राज ठाकरे यांनी सांगितला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.