Sachin Sawant । “गुजरातच्या हितासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहेत”; सचिन सावंतांचा खोचक टोला
Sachin Sawant । मुंबई : C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Projec) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विटच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत.
सचिन सावंत म्हणाले, “देशात तीन सरकार गुजरातच्या हितासाठी कार्यरत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, दुसरे गुजरात सरकार आणि तिसरे शिंदे फडणवीस सरकार! गेल्या काही महिन्यांपासून ज्या वेगाने गुजरातकडे महाराष्ट्रात होऊ घातलेले प्रकल्प चालले ते पाहता जितका काळ हे राहतील तितका महाराष्ट्र कंगाल होईल.”
देशात तीन सरकार गुजरातच्या हितासाठी कार्यरत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, दुसरे गुजरात सरकार आणि तिसरे शिंदे फडणवीस सरकार! गेल्या काही महिन्यांपासून ज्या वेगाने गुजरातकडे महाराष्ट्रात होऊ घातलेले प्रकल्प चालले ते पाहता जितका काळ हे राहतील तितका महाराष्ट्र कंगाल होईल pic.twitter.com/LS1gytJMip
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 28, 2022
ट्वीटबरोबर सचिन सावंत यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. ते म्हणाले की, “फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीनंतर शिंदे-फडणवीस हे दुसरं सरकार आहे, गुजरातच्या हितासाठी मोदी सरकारच्या आज्ञेनुसार अतिशय समर्पित होऊन काम करत आहे. गुजरात सुजलाम, सुफलाम व्हावा यासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहे. एक मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार, दुसरं गुजरातचं सरकार, तिसरं महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार. त्यामुळे ज्या वेगाने महाराष्ट्रातील काही प्रकल्प काही महिन्यांमध्ये गुजरातकडे चालले आहेत, तो वेग पाहता जितका काळ हे सरकार राहील, तेवढ्या कालावधीत महाराष्ट्र कंगाल झाल्याशिवाय राहणार नाही, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.” अशी घणाघाती टीका त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारवर केली आहे.
याशिवाय “मोदी सरकारची मागील आठ वर्षांपासूनची इच्छा पूर्णपणे स्पष्ट आहे की, देशातील सगळे प्रकल्प हे गुजरातमध्येच जावेत. परंतु महाराष्ट्राचं अहित होत असताना महाराष्ट्रातील भाजपा नेते हे शब्द उच्चारण्याची हिंमत करत नाहीत. यापेक्षा दुर्दैवाची बाब कुठली असणार नाही. महाराष्ट्राच्या अहिताच्या पापाचे वाटेकरी ते आहेत.” असे आरोप सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra । शिंदे-फडणवीस सरकारच्या ३ महिन्यांच्या काळात महाराष्ट्राने ‘हे’ ४ मोठे प्रकल्प गमावले
- Ajit Pawar । “ शिंदे-फडणवीसांनी त्यांच्या मंत्र्यांना जरा…”; अजित पवारांचा जोरदार हल्लाबोल
- Ajit Pawar । “जे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, त्यांचे..”; अजित पवारांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
- Narayan Rane | ‘नारायण राणे यांची किंमत आजच्या घडीला चाराण्याचीच’
- Rohit Pawar । “…ही भाजपची काम करण्याची पद्धत”; ‘त्या’ प्रकरणावरून रोहित पवार यांचा हल्लाबोल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.