Sachin Sawant । जितका काळ शिंदे-फडणवीस सरकार राहील, तितका महाराष्ट्र कंगाल होईल; काँग्रेसचा दावा
Sachin Sawant | मुंबई : C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Projec) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
सचिन सावंत म्हणतात, देशात तीन सरकार गुजरातच्या हितासाठी कार्यरत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, दुसरे गुजरात सरकार आणि तिसरे शिंदे फडणवीस सरकार! गेल्या काही महिन्यांपासून ज्या वेगाने गुजरातकडे महाराष्ट्रात होऊ घातलेले प्रकल्प चालले ते पाहता जितका काळ हे राहतील तितका महाराष्ट्र कंगाल होईल, असं ते म्हणालेत.
ट्वीटबरोबर सचिन सावंत यांनी एक व्हिडिओही शेअर केला असून, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की “फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीनंतर शिंदे-फडणवीस हे दुसरं सरकार आहे, गुजरातच्या हितासाठी मोदी सरकारच्या आज्ञेनुसार अतिशय समर्पित होऊन काम करत आहे. गुजरात सुजलाम, सुफलाम व्हावा यासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहे. एक मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार, दुसरं गुजरातचं सरकार, तिसरं महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार. त्यामुळे ज्या वेगाने महाराष्ट्रातील काही प्रकल्प काही महिन्यांमध्ये गुजरातकडे चालले आहेत, तो वेग पाहता जितका काळ हे सरकार राहील, तेवढ्या कालावधीत महाराष्ट्र कंगाल झाल्याशिवाय राहणार नाही, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.”
महत्वाच्या बातम्याः
- Saamana | सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला हल्ला
- Bachhu Kadu। 1 नोव्हेंबरला ट्रेलर, तर 15 दिवसांनी पिक्चर दाखवेन; बच्चू कडूंचा थेट शिंदे-फडणवीसांना इशारा
- Chandrakant Khaire । “ती खासदार बाई खूप टरटर करत होती, पण बच्चू कडूंनी आता माघार घेऊ नये”
- Rituja Latke । अंधेरी पोटनिवडणूकीत धक्कादायक ट्विस्ट; थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी
- Jayant Patil। बच्चू कडू यांनी खोके घेतले की नाही हे त्यांना सिद्ध करावे लागेल; राणांच्या आरोपानंतर पाटलांचं आव्हान
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.