Sachin Sawant । “सत्य कटू असलं तरी ते सत्यच असतं…”; राऊतांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसचा पलटवार

Sachin Sawant । मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरु आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडी मध्ये देखील या कारणामुळे फुट पडण्याची शक्यता आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर घणाघात केलाय. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा सूचक इशाराही काँग्रेसला दिला आहे. संजय राऊतांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते संजय सावंत (Sachin Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणालेत सचिन सावंत? (Sachin Sawant)

सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले, “मला असं वाटतं की या संदर्भात सगळ्यांनी विचार करायचा आहे. ज्या कारणावरती आम्ही एकत्र आलो, त्या कारणापूर्वी देखील दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद होते हे स्पष्ट होतं. तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते यामुळे एकत्र आलो नव्हतो, देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो होतो.”

“त्यामुळे शिवसेना ज्यावेळी कुठलाही विषय मांडते, त्यावेळी ते विषय लोकशाही आणि संविधानाच्या परिघातले नसले तर ते आम्हाला आवडतात असं नसतं. त्यामुळे हा विषय देशातील सर्वोच्च गोष्टी काय आहे, जनतेला काय वाटतं या दृष्टीने पक्षाने विचार करावा”, असंही सावंत यांनी म्हटलंय.

पुढे ते म्हणाले, “सावरकरांबद्दल राहुल गांधी जे बोलले त्यामध्ये कुठल्याप्रकारची ऐतिहासिक मोडतोड नाही ते सत्य आहे. त्यामुळे सत्य कटू असलं तरी ते सत्यच असतं. त्याला आता करणार काय आपणे ते बदलू शकत नसतो. देश चालत असताना तो गांधींच्या विचाराने चालावा, तो सावरकरांच्या विचाराने चालूच शकत नाही, अशी काँग्रेसची भूमिका आहे.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.