Sachin Sawant । “…सरनाईक विचारती भाजपाला हेची फळ काय मम तपाला?”; सचिन सावंतांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

Sachin Sawant ।  मुंबई : प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाले होते. महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर मधल्या काळात सरनाईक हे पक्षातून बाजूला पडले होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आमदार प्रताप सरनाईक हेदेखील शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यामुळं ईडीची कारवाई थांबली की काय? असा सवाल करत ठाकरे गटाने त्यांना फैलावर घेतलं होत. मात्र, आता पुन्हा सरनाईक ईडीच्या रडारवर आले आहेत. सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या तब्बल ११.४ कोटींची मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतली होती.

त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार राज्यात आल्याने आणि सत्ता बदल झाल्यानंतर सरनाईकांवरील कारवाई टळणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता ती मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडीला परवानगी मिळाल्याने प्रताप सरनाईक यांच्या अडचहणीत वाढ झाली आहे. शिंदे गटासोबत असणाऱ्या प्रताप सरनाईकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीटद्वारे सरनाईकांना टोला लगावला आहे. ‘घाबरुनी भयंकर ज्या छळाला केले ‘प्रताप’ मविआ सरकार पाडण्याला, सरनाईक विचारती भाजपाला हेची फळ काय मम तपाला?’ अशा आशयाचं ट्विट करत सचिन सावंतांनी प्रताप सरनाईक यांच्यावर बोचरी टीका केली आहे. या संदर्भात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.