InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

समाजमाध्यमांवरील धमक्यांविरोधात सचिन सावंतांची तक्रार

- Advertisement -

सत्ताधारी भाजपचे समर्थक सरकारवर टीका करणा-यांना समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत आहेत. सोशल मिडीयावरील या विकृतांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे यांना समाजमाध्यमांवर त्यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल अत्यंत हीन पातळीची भाषा वापरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राज्यभरात अशा त-हेच्या अनेक घटना रोज घडत आहेत.मला स्वतःला २०१५ साली चिक्की घोटाळा उघडकीस आणला असताना धमक्या आणि शिवीगाळीचा अनुभव आला होता त्यावेळी याची रितसर तक्रार समतानगर पोलीस ठाणे कांदिवली, मुंबई येथे केली होती. मे महिन्यामध्ये देखील असाच वाईट अनुभव पुन्हा आला त्याचीही तक्रार सदर पोलीस स्थानकात मी दि. ७ मे २०१९ रोजी केलेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सरकारवर केलेल्या टीकेवरील ट्वीट संदर्भात समाजमाध्यमांवर अत्यंत हीन पातळीवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जात असून फोनवरून व समाजमाध्यमांवरून जाहीर धमक्या दिल्या जात आहेत. यामध्ये राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचा दंभ या धमक्या देणा-यांकडून दाखवला जात आहे.

प्रश्न हा आहे की विरोधकांनी केलेली टीका सरकारला आवडत नाही का?लोकशाहीमध्ये विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीची उदात्त परंपरा व पुरोगामी विचारधारा असणा-या महाराष्ट्रात यापूर्वी असे कधी घडले नाही. लोकशाहीच्या या प्रथांचे व परंपरांचे पालन करण्याची जबाबदारी सरकारचे प्रमुख आणि राज्याच्या गृहविभागाचे मंत्री म्हणून आपली आहे. त्यामुळे उन्मत व सत्तेच्या धुंदीने बेभान झालेल्या या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी असे सावंत म्हणाले.

 

महत्त्वाच्या बातम्या 

- Advertisement -

मुख्यमंत्री कुमारस्वामींचा ‘हा’ साधेपणा सध्या चर्चेत

२२ ते २६ जून राज्यात वादळी पाऊस; पेरणीची घाई करू नये- कृषी विभाग

अडवाणी, वाजपेयींच्या पावलावर फडणवीसांचे पाऊल; मतदारसंघात रथयात्रा काढणार

चोरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यास मनसे महिला कार्यकर्त्यांकडून चोप 

 शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका; कृषिमंत्र्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.