शाहरुखच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर सचिन वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थान एनसीबीनं अटक केली आहे. त्याला नक्की कोणत्या कारणासाठी अटक करण्यात आली याची माहिती एनसीबीनं दिली आहे. आर्यनच्या अरेस्ट मेमोमध्ये याचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता थोड्याचवेळात या सगळ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना करण्यात आलीय.

या सगळ्या आतापर्यंतच्या पार्शवभूमीवर एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ड्रग्स प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची खास ओळख आहे. आता शाहरुख खानच्या मुलाची चौकशी समीर वानखेडे करत आहेत. या प्रकरणात प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, आर्यन खानवर अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्याला अटकही करण्यात आलं नाही.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा