दुःखद : ‘गुलाबो सिताबो’ फेम अभिनेत्री फारूख जफर पडद्याआड

नवी दिल्ली : ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटातील फेम अभिनेत्री बेगम फारूख जफर यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लखनऊ येथील गोमतीनगरच्या निवासस्थानी बेगम फारूख यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बॉलीवूडमधून अनेक कलाकारांनी बेगम फारुख जाफर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘गुलाबो सिताबो’ चित्रपटाची लेखिका जुही चतुर्वेदी हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत बेगम फारूख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना लखनऊच्या सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

मागच्या वर्षी आलेला ‘गुलाबो सिताबो’ हा बेगम फारूख यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. यामध्ये त्यांनी फातिमा बेगम ही भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्यांनी ‘उमराव जान’ या चित्रपटात रेखाच्या आईची भुमिका साकारली होती. तसेच त्यांनी ‘पीपली लाईव्ह’, ‘स्वदेश’, ‘सुलतान’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा