Sadabhau Khot | शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन! सदाभाऊ खोत यांचा मोर्चा पुणे-बेंगलोर हायवेवर

Sadabhau Khot | सातारा: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या चार दिवसापासून सुरू असलेली रयत क्रांती संघटनेची “वारी शेतकऱ्यांची” ही पदयात्रा आज (25 मे) साताऱ्यात पोहोचली आहे. सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत सदाभाऊ खोत पुणे बेंगलोर महामार्गावर ठिय्या मांडणार आहे.

Sadabhau Khot’s agitation on the Pune-Bangalore highway

रयत क्रांती संघटनेने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 22 मे पासून कराड ते सातारा “वारी शेतकऱ्यांची” ही पदयात्रा काढली आहे. आमच्या मागण्यांवर आणि प्रश्नांवर राज्य सरकारने निर्णय नाही घेतला, तर ही वारी मुंबईपर्यंत जाऊ शकते, असा इशारा सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिला आहे.

आज ही यात्रा साताऱ्याजवळ आल्यावर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खोत यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. राज्य शासनाने आमचे प्रश्न सोडवले नाही तर साताऱ्यातून पाचशे वाहनं थेट मुंबईतील मंत्रालयाला जाऊन धडकतील, असा इशारा सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिला आहे.

महाराष्ट्रामध्ये उसाला चार हजार रुपये भाव मिळतो. गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा. दोन कारखान्यांमधील पंचवीस किलोमीटरचे हवाई अंतर कमी करावे. या सर्व मागण्यांसाठी सरकारला वेळ नाही, असही खोत (Sadabhau Khot) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43sp4ng