InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीची विचारसरणी काय आहे हे दिसून येतं’

- Advertisement -

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.  धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीची विचारसरणी काय आहे हे दिसून येतं, अशी भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीला जनता या निवडणुकीतून हद्दपार करेल, पैशाच्या आणि गुंडगिरीच्या जोरावर राजकारण करणाऱ्या धनंजय मुंडेची ही दादागिरी जनता सहन करणार नाही.

धनंजय मुंडे यांनी विडा येथे झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बोलतांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका केली होती, टिकेचा व्हिडिओ आज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे विरोधात पंकजा मुंडे समर्थक, वंजारी समाज आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. भाजपा महायुतीच्या परळी येथे झालेल्या समारोपाच्या सभेत या विषयावर आक्रमक पवित्रा घेत पंकजा  मुंडे यांनी धनंजय मुंडेवर कडाडून हल्ला चढवला होता. भाषणानंतर त्यांना भोवळ आल्याने कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.