InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

स्वाभिमानीची मस्ती खपवून घेणार नाही – सदाभाऊ खोत

पंतप्रधान पीक विमा योजनेत अनेक त्रुटी असल्याची ओरड सुरुये. यावर चर्चेने तोडगा काढण्यासाठी पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेंव्हा स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेने गोंधळ घातला. विमा कंपनी आणि बँका शेतकऱ्यांची पिळवणूक करतायेत. तसेच यात मोठा घोटाळा होतोय, याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

पीक विमा योजनेत त्रुटी असल्याचं खुद्द कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मान्य करत. याच खापर विमा कंपनी आणि बँकांवर फोडलं. विमा कंपन्यानी गावोगावी पोहचायला हवं, बँकांनी या योजनेसाठी एक कर्मचारी ठेवावा. असं खोत यांनी सुचवलं. पण हा सल्ला कार्यशाळेत उपस्थित स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेला पचनी पडला नाही. त्यांनी थेट गोंधळ घातला आणि पीक विमा योजनेत मोठा भ्रष्टाचार होतोय. याची चौकशी उच्चस्तरीय करावी अशी मागणी घोषणांद्वारे केली. याची बातमी प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्याने कार्यशाळेत उपस्थित कृषिमंत्री अनिल नाराजी व्यक्त केली. स्वाभिमानीची मस्ती खपवून घेणार नाही. हिम्मत असेल तर मैदानात या असं आव्हान खोत यांनी दिलं.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply