Sadanand Kadam | १५ मार्च पर्यंत सदानंद कदम ईडीच्या जाळ्यात, अनिल परबांच्या अडचणीत वाढ

Sadanand Kadam | मुंबई: महाराष्ट्रात नाही तर देशातच ईडीचे प्रकरण सुरु आहे. लालूप्रसाद यादव यांचीही ईडीची चौकशी लावण्यात आली आहे.  महाराष्ट्रात साई रिसॉर्ट प्रकरणी शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर काल ईडीने धाड मारली. काल मुंबईमध्ये त्यांची चौकशी झाली. त्यानंतर काही दिवसांसाठी त्यांना ईडीच्या कोठडीत रहावं लागेल असं म्हटलं जात होतं. परंतु आज १५ मार्च पर्यंत सदानंद कदम यांना कोर्टाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यामुळे आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आह.

१५ मार्च पर्यंत होणार कोठडी ( Sadanand Kadam custody Will Be Held Till 15 march )

सदानंद कदम यांच्यावर ईडीने युक्तीवाद केला. या युक्तीवादानंतर ईडीने १४ दिवसांची कोठडीसाठी मागणी केली होती. कोर्टाने प्रथमदर्शी मनी लॉड्रीन्ग झाल्याचे मान्य केले. म्हणून सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत कोर्टाने कोठडी सुनावणी केली. त्यांना ब्लड प्रेशरचा आजार असल्याने गोळ्या देण्यात याव्यात. परंतु घरचे जेवण देता येणार नाही. अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

रत्नागिरीतील दापोली येथे साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांच्या नावावर अनिल परब यांनी प्रॉपर्टी खरेदी विक्री केल्या प्रकरणी किरीट सोमय्यांनी सदानंद कदम आणि अनिल परब यांच्यावर आरोप -प्रत्यारोप केले. अशातच अनिल परब यांचं देखील नाव आलं आणि ते देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ ( Anil Parab In Controvercy)

सदानंद कदम हे रामदास कदम यांचे भाऊ आहेत.  सदानंद कदम आणि रामदास कदम यांच्यात पहिल्यापासून वाद आहे. कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. यामुळे आता आमदार अनिल परबांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

महत्वाच्या बातम्या