InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नथुराम गोडसेबद्दलच्या वक्तव्यावर प्रज्ञासिंह ठाकूरने मागितली माफी

नथुराम गोडसे देशभक्त होते… आहेत.. आणि राहतील, असे वक्तव्य भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. त्यानंतर भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नसल्याचे म्हटले होते, तसेच प्रज्ञासिंहने माफी मागावी, असे म्हटले होते.

नथुराम गोडसेबद्दलच्या वक्तव्यावर आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने माफी मागितली आहे. “ते माझं वैयक्तिक मत, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, कोणाचं मन दुखावलं असल्यास माफी मागते,” असे साध्वी प्रज्ञासिंह म्हणाली.

“मी रोड शोमध्ये होते. भगव्या दहशतवादशी संबंधित मला प्रश्न विचारण्यात आला. मी चालता चालता तातडीने उत्तर दिलं. माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता, मी माफी मागतो. गांधीजींनी देशासाठी जे काही केलं आहे, ते विसरता येण्यासारखं नाही. मी त्यांचा अतिशय आदर करते. मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मी पक्षाची शिस्त पाळणारी कार्यकर्ता आहे. जी पक्षाचे विचार आहेत, तेच माझे विचार आहेत.”, असे स्पष्टीकरण प्रज्ञासिंह ठाकूरने दिले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply