साईबाबा जन्मस्थळाचा वाद आता आणखी चिघळणार !

            साईबाबा जन्मभूमी प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिर्डीकरांनी घेतलेल्या भूमिकेवर पाथरीकर आता आक्रमक झाले आहेत. शिर्डीच्या शिष्टमंडळाची बाजू एकूण घेतल्यानंतर आमचीही बाजू मुख्यमंत्र्यांनी ऐकणे गरजेचे आहे. एकतर्फी निर्णय घेतला असल्याचा आरोप साई जन्मभूमी कृती समितीने केला आहे.
Loading...
शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञांची भेट घेणार असून या बैठकीतून पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली आहे.शिर्डी येथील साईबाबाची पाथरी ही जन्मभूमी असल्याचा दावा पाथरीकरांनी केल्यानंतर शिर्डी विरूद्ध पाथरी असा वाद सुरु झाला.
 शिर्डी येथील समितीने बाबांनी आपल्या जन्माविषयी आणि मूळ गावाविषयी कधीही सांगितले नाही, अशी भूमिका घेतली. त्याला समर्थन म्हणून शिर्डी बंदचे आंदोलनही केले.याला प्रत्युत्तर  म्हणून पाथरीतील लोकांनी महाआरतीचे आयोजन करून शिर्डीकरांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला.या वादावर तोडगा काढण्यासाठी शिर्डीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र पाथरीकरांना आपली बाजू मांडण्यासाठीही भेट न दिल्याने पाथरीकरांनी नाराजी व्यक्त केली होती. साईबाबा यांचा जन्म पाथरीला झाला यावर ठाम आहेत. आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे आपण आपली बाजू कोर्टात मांडू आणि न्याय मिळवू, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.