‘लाल कप्तान’ मध्ये सैफ दिसणार नागा साधूच्या रूपात

लाल कप्तान सिनेमात अभिनेता सैफ अली खान एका वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. याआधी सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच झाले तेव्हा सैफ नागा साधूच्या रूपात दिसला होता. पण आता सिनेमाच्या ट्रेलरचा पहिला भाग युट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. नागा साधू शोधाशोध करत ‘भोले का सिपाही’ म्हणत सूड घेतान दिसतो. सिनेमात सोनाक्षी सिन्हाची छोटीशी भूमिका असणार आहे पण ट्रेलरमध्ये फक्त तिचा आवाज ऐकू येतो. ट्रेलरमध्ये सुरवातीला फक्त सैफच कपाळ क्लोज शॉटमध्ये दिसत. राख लावलेला चेहरा आणि त्यावर लाल टिळा लावलेला सैफ सिंगल लुकमध्ये दिसतो. सैफ म्हणजेच नागा साधू लोकांची कत्तल करून त्यांना घसरत घोड्याला बांधून आणतो. याआधी सैफने कधीही अशा भूमिका केल्या नाही पण एका वेगळ्या लुकमध्ये सैफ या सिनेमात पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर येत आहे. एनएच 10 सिनेमाचे दिग्दर्शन नवदिप सिंघ य या सिनेमाचे दिग्दर्शक असून एरोस इंटरनॅशनल आणि कलर येलो प्रोडक्शन अंतर्गत हा सिनेमा आनंद एल रॉय आणि सुनील लुल्ला प्रोडूस करत आहेत. हा सिनेमा 18 ऑक्टोंबर रोजी रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.