“मालिकांच्या सांगण्यावरून साईलने समीर वानखेडेंवर आरोप केलेत”

मुंबई : आर्यन खान प्रकरणानं गेल्या काही दिवसांपासून वेगळं वळण घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केले होते.

यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा वाद आणखीनच वाढत चालला आहे. यानंतर समीर वानखेडे हे अंतर्गत चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. या आरोपांसंदर्भातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर मंगळवारी आरोप केले आहेत.

प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर आरोप हे नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून केले आहेत, असं मोहित कंबोज यांनी सांगितलं आहे. मोहित कंबोज यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. शेअर करताना त्यांनी कॅपश्न्समध्ये लिहिताना नोटरी राम जी गुप्ता स्टिंग ऑपरेशन्स असं लिहीलं आहे.

हत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा