सायना नेहवालने बायोपिककरता परिणीती चोप्राला दिल्या ‘अशा’ शुभेच्छा!

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये अभिनय करताना बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री सायना नेहवाल ही सायनाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेकरिता परिणीती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मेहनत घेत असून लवकरच परिणीती सायनाच्या भूमिकेत चाहत्यांना लवकरच मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या चित्रपटाची शुटिंग ११ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून सायनाने या चित्रपटाचे शुटिंग सुरू होण्यापुर्वी संपुर्ण चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

या बायोपिकसाठी अभिनेत्री परिणीतीने आपले लक्ष पुर्णपणे सायना आणि तिच्या खेळाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी केद्रींत केले आहे. याकरिता तिने तासन् तास बॅडमिंटनच्या कोर्टमध्ये आपला घाम गाळत सराव करत आहे. परिणीतीचे ट्रेनिंग लवकरत संपणार आहे.

सोमवारी सायनाने सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून परिणीती आणि या बायोपिकच्या संपुर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना असे म्हटले की, ‘या बायोपिकच्या संपुर्ण प्रवासात मी सोबत असेन, चित्रपटाच्या टीमला माझ्या खूप शुभेच्छा!’

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.