साकीनाका बलात्कार प्रकरण: पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मुंबईतील ‘निर्भया’चा मृत्यू

मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलीय. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या घृणास्पद कृत्याने मात्र सर्व सीमा ओलांडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणामुळे अख्खा देश हादरला होता. तशीच घटना मुंबईतील एका तरुणीसोबत घडली आहे.

मुंबईत एका महिलेसोबत नवी दिल्लीतील निर्भया प्रमाणे भयावह प्रकार घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही महिला ३२ वर्षांची आहे. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अंतर्गत अवयवांना जखमा झाल्यात. त्याशिवाय आरोपीने तिच्या गुप्तांगात रॉड घातल्याची शंका डॉक्टरांनी व्यक्त केली होती. सध्या महिलेवर शस्त्रक्रिया सुरू होती. मात्र आता उपचारादरम्यान, महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले आहे. पोलिसांना संबंधित परिसरात काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपीचे दुष्कृत्य कैद झालं आहे. रात्रीच्या अंधारामुळे सीसीटीव्हीत फारसं स्पष्ट दिसत नाहीय. पण परिसरात संशयास्पद घटना घडतेय, ते स्पष्टपणे जाणवत आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा