‘मोदी-शहांकडून देशाची विक्री; अंबानी, अदानींकडून खरेदी’, बाळासाहेब थोरातांचा घणाघात

नाशिक : गेल्या काही दिवसापासून नवीन कृषी कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून शेतकरीच नव्हे तर संपूर्ण जनता वेठीस आली आहे. ज्या शेतकऱ्यांसाठी कायदे केले त्यांना विश्वासात घेतले नाही. त्यावर चर्चा केली नाही. ज्यांनी विरोध केला त्या खासदारांना निलंबित करण्यात आले. असे आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मोदी सरकार वर केलेत.

तसेच या आंदोलनाच्या पार्शभूमीवर पुढे हे कायदे भांडवलदार यांच्यासाठी उपयोगी असून यामुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. उलट मोदी आणि शहा हे देशाची विक्री करत असून अंबानी आणि अदाणी हे खरेदी करत असल्याने देशाचा बट्ट्याबोळ झाला असल्याचही बाळासाहेब थोरात म्हणाले. शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ विविध शेतकरी संघटनांच्या वतीने नाशिक रोड येथे शेतकरी जनजागृती परिषदेसह ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना थोरात म्हणाले की, केंद्रामध्ये जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हापासून रेल्वे, एलआयसी, विमानतळे आणि रिझर्व्ह बँकेचे खासगीकरण सुरू केले असून देशाला फक्त भांडवलदारांच्या ताब्यात देत आहे. दिल्लीमध्ये हरियाणा, पंजाबसह इतर राज्यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ते समजत नाही. जेव्हा चिमटा बसेल तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांना समजेल असा टोला त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा