Salman Khan | “एकाच फ्रेममध्ये दोन…”; सलमानच्या वाढदिवसानिमित्त शाहरुखच्या उपस्थितीवर चाहत्यांची प्रतिक्रिया
Salman Khan | मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आज त्याचा 57 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. भाईजानच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी पार्टीचे आयोजन केले. अर्पिताच्या मुंबईतील घरी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यामध्ये बॉलीवूड किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) ने देखील हजेरी लावली होती.
सलमान खानच्या बर्थडेनिमित्त शाहरुख खानने हजेरी लावली होती. दरम्यान, शाहरुख आणि सलमानच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पार्टी झाल्यानंतर सलमान शाहरुखला बाहेर सोडण्यासाठी आला होता. त्यावेळी दोघांनी एकमेकांची भेट घेत, फोटोसाठी पोज दिल्या. या फोटोमध्ये दोघेही काळ्या रंगाच्या कॅज्युअलमध्ये दिसत आहे.
Salman Khan | "एकाच फ्रेममध्ये…"; सलमानच्या वाढदिवसानिमित्त शाहरुखच्या उपस्थितीवर चाहत्यांची प्रतिक्रियाhttps://t.co/BptsyVf0nY
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 27, 2022
सलमान आणि शाहरुख यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्यातील सर्व वाद संपवले आहेत. दरम्यान, शाहरुखने सलमानच्या वाढदिवसाला हजेरी लावल्यानंतर चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर एक चाहता कमेंट करत म्हणाला आहे की,”एकाच फ्रेममध्ये दोन किंग”. तर अजून एक चाहता कमेंट करत म्हणाला की,”दोघांना पुन्हा एकदा सोबत स्क्रीनवर बघता येईल का?”. अशा प्रकारच्या कमेंट्स चाहत्यांकडून या व्हिडिओवर केल्या जात आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर रेड हार्ड इमोजी टाकले आहेत.
सलमान खानच्या या वाढदिवस पार्टीला सोनाक्षी सिन्हा, संगीता बिजलानी, अरबाज खान, सोहेल खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात तापमानात घसरण, तर हरियाणामध्ये 2.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
- Devendra Fadnavis | मुंबईतील अतिधोकादायक इमारतींना स्वयंपुनर्विकास करण्याची परवानगी देणार – उपमुख्यमंत्री
- Eknath Shinde | “विरोधी पक्षनेत्यांच्या…” ; विरोधकांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
- Winter Session 2022 | कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अजित पवारांची सभागृहात मागणी
- Sushma Andhare | उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला, मंत्री गुवाहाटीला ; सुषमा अंधारेंचा टोला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.