Salman Khan | “त्याने माझ्या…” ; एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीचा सलमान खान बाबत मोठा खुलासा

Salman Khan | मुंबई: बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) सध्या चर्चेमध्ये आहे. सलमान खानने तब्बल तीन दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अशात सलमान खानच्या लव्ह लाईफवर प्रचंड चर्चा होत असते. सलमान खानचे नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर नेहमी जोडले जातात. पण एवढ्या अभिनेत्रीसोबत नाव जोडूनही भाईजान अजून सिंगल आहे.

सलमान खानच्या अफेसबद्दल अनेक गोष्टी समोर येत असतात. अशात भाईजानची एक्स-गर्लफ्रेंड सोमी अली (Somi Ali) ने सलमान बाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सोमी अली आणि सलमान खान 1993 मध्ये रिलेशनशिप मध्ये होते. पण काही दिवसानंतर ते वेगळे झाले होते. सलमानच्या गैरवर्तुणुकीमुळे ते दोघे वेगळे झाल्याची माहिती समोर आली होती.

सोमी अलीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत याविषयी माहिती शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने लहानपणी आणि सलमानबरोबर असताना झालेल्या शोषणाबद्दल भावना व्यक्त केल्या आहे. सलमान तिला सिगरेटचे चटके द्यायचा तिचा लैंगिक छळ करायचा, असा आरोप सोमीने सलमानवर लावला आहे. सोमीने सलमानवर जेव्हा हे आरोप केले, तेव्हा सलमानने तिच्या डोक्यावर बाटली फोडली होती, अशी चर्चा देखील रंगली होती. या घटनेमागील तथ्य सोमी अलीने नुकतेच एका पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे.

सोमी म्हणाली, “त्याने जर माझ्या डोक्यात बाटली फोडली असती तर मला रुग्णालयात जावं लागलं असतं. त्याने माझ्या डोक्यावर दारूचा ग्लास रिकामा केला होता. मी तेव्हा पहिल्यांदा दारूचे सेवन करणार होते. माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण होती. तिने हे सगळं प्रत्यक्षात पहिलं आहे. मी तिचं नाव घेऊ शकत नाही. पण तेव्हा त्याने माझ्या डोक्यात बाटली फोडली हे खोट आहे.”

सोमी सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच्या बऱ्याच गोष्टीवर उघडपणे भाष्य केले आहे. त्याने तिच्यावर बरेच अत्याचार केले आहे असे देखील ती म्हणाली आहे. सलमान तिच्यासोबत जे काही वागला आहे ते ती अजून विसरलेली नाही. ते सगळं आठवण तिची आज देखील झोप उडते, असं ती एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.