अखेर शेतकरी आंदोलनावर सलमान खानने सोडले मौन, म्हणाला…

मुंबई : भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे, मात्र असं असलं तरी भारतातील काही सेलिब्रेटी तसेच क्रिकेटपटूंनी या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.

रिहानासह काही परदेशी सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात भाष्य केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे.

सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी ट्वीट केल्यानंतर #IndiaTogether हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. तसेच अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिलीय.

यानंतर आता गुरुवारी सलमान खान मुंबईतील एका म्युझिक शोच्या लाँचिंगसाठी आला होता, त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सलमानला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, सलमानने बचावात्कम पवित्रा घेत समतोल उत्तर दिलंय. नक्कीच मी यासंदर्भात भाष्य करेल, जे योग्य आहे ते व्हायलाच हवं, उचित व्हायलाच हवं, बरोबर ते बरोबर व्हावे, सर्वांसाठी ! असे उत्तर सलमान खानने मीडियाशी बोलताना दिले.

त्यामुळे, सलमानने दिलेल्या उत्तराचा नेमका अर्थ काढायचं काय, असा प्रश्न अनेकांना पडलाय. सलमानने ना थेट शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले, ना विरोध. त्यामुळे, सलमान बोल कर भी कुछ नही बोला… असंच म्हणावं लागेल. दरम्यान, अद्याप बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि मिस्टर परफेशनिस्ट आमीर खानने यासंदर्भात ट्विट किंवा भाष्य केलं नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा