तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांनी केलं सलमानला काळवीट शिकारीसाठी प्रवृत्त
- Advertisement -
टीम महाराष्ट्र देशा : तब्बू आणि सोनाली बेंद्रे या दोघींनी सलमानला काळवीट शिकारीसाठी प्रवृत्त केल्याचं वृत्त ‘सीएनएन न्यूज १८’ ने दिले आहे . ‘मला बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि काळवीटांना पळताना मी पाहिलं. सलमानने बंदुकीचा चाप ओढला. सोनाली बेंद्रे आणि तब्बूने त्याला म्हटलं की, जर तू इतक्या लांब आलाच आहेस तर आता शिकारी कर,’ असं त्या प्रत्यक्षदर्शीने म्हटलं. असे वृत्त ‘सीएनएन न्यूज १८’ ने दिले.
सलमानला दोन अटींवर जामीन
सलमान खानला जामीन मंजूर करताना, कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत.
Loading...
Related Posts
- Advertisement -
- सलमानला 7 मे रोजी कोर्टात यावं लागेल.
- देश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.
काय आहे प्रकरण ?
कांकाणी गावात दोन काळवीट शिकार केल्याचं हे प्रकरण आहे. सलमानने १९९८ मध्ये एक आणि दोन ऑक्टोबरच्या रात्री विविध ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. याप्रकरणी सलमान दोषी ठरला आहे.दरम्यान, कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, तेव्हा सर्वांनीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते.आपण काळविटाची शिकार केली नाही, त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होतं.मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान खानला दोषी ठरवत असल्याचं जाहीर केलं. तर इतर आरोपींना केवळ पुराव्याअभावी निर्दोष सोडलं.
Loading...