शाहरुखच्या मदतीला धावला सलमान खान; आर्यनच्या सुटकेसाठी आता ‘हे’ वकील लढणार केस

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनला शनिवार २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकत ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणात अडकल्यानंतर आर्यनची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता शाहरुखने केस लढवण्यासाठी त्याचे वकील बदलले आहेत.

दरम्यान, टीव्ही ९ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख खानने त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांच्या ऐवजी केस लढण्यासाठी अमित देसाई यांची निवड केली आहे. अमित देसाई यांनी २००२ मध्ये सलमान खानची हिट आणि रन केस लढवली होती. यामुळे सलमान खाननेच शाहरुखला वकील बदलण्याचा सल्ला दिला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

क्रूझवरील अंमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने याआधी आर्यन खानसह इतर ७ आरोपींना एनसीबी कोठडी देण्याची मागणी फेटाळत त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. याविरोधातच सध्या आर्यन खानकडून विशेष सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा