Salt Side Effects | अतिरिक्त मिठाचे सेवन केल्याने निर्माण होऊ शकतात ‘या’ समस्या

Salt Side Effects | टीम महाराष्ट्र देशा: कोणत्याही खाद्यपदार्थांमध्ये मीठ (Salt) हा खूप महत्त्वाचा घटक असतो. कारण मिठाशिवाय कोणतेही खाद्यपदार्थ पूर्ण होऊ शकत नाही. काही लोकांना जेवणामध्ये कमी मीठ खायला आवडते, तर काही नाही जेवणात जास्त मीठ आवडते. पण तुम्हाला माहित आहे का? मिठाचे अतिरिक्त सेवन केल्याने तुमची प्रकृती बिघडू शकते. होय! अतिरिक्त मिठाचे सेवन केल्याने आरोग्याला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. पौढ व्यक्तींनी दररोज सुमारे 2400 मिलीग्राम मिठाचे सेवन केले पाहिजे. यापेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास शरीराला हानी होऊ शकते. अतिरिक्त मिठाचे सेवन केल्याने शरीराला पुढील परिणाम भोगावे लागू शकतात.

अतिरिक्त मिठाचे (Salt) सेवन केल्याने निर्माण होऊ शकतात ‘या’ समस्या

हृदयाच्या समस्या

मिठाचे अतिरिक्त सेवन केल्याने रक्तवाहिन्यांवर दाब निर्माण होतो. परिणामी रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या वाढायला लागतात. जे लोक मर्यादेमध्ये मिठाचे सेवन करतात त्यांना या समस्या उद्भवत नाही.

किडनीच्या समस्या

तुम्ही जर अतिरिक्त मिठाचे सेवन करत असाल, तर तुम्हाला किडनीचे आजार होऊ शकतात. त्याचबरोबर मिठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने किडनी खराब होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नेहमी माफक प्रमाणात मिठाचे सेवन केले पाहिजे.

शरीरावर सूज येते

अतिरिक्त मिठाचे सेवन केल्याने शरीरावर सूज यायला सुरुवात होते. त्याचबरोबर मिठाचे अति सेवन केल्याने शरीरात वॉटर रिटेन्शन होते. म्हणूनच नेहमी मुबलक प्रमाणात मिठाचे सेवन केले पाहिजे.

ऑस्टियोपोरोसिस

अन्नामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते. जेव्हा तुम्ही अति मिठाचे सेवन करतात, तेव्हा तुम्ही शरीरातून कॅल्शियम कमी करतात. परिणामी शरीरातील हाडे कमकुवत होऊन ऑस्टियोपोरोसिसची समस्या निर्माण होऊ शकते.

टीप: वरील माहितीबद्दल संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.