Sam Curran | पंजाब किंग्जमध्ये परतल्यानंतर सॅम करनने केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…

Sam Curran | नवी दिल्ली: आयपीएल 2023 लिलावामध्ये सॅम करन (Sam Curran) सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. सॅम करनची मूळ किंमत दोन कोटी रुपये होती. आयपीएल लिलावामध्ये राजस्थानने सॅम करनसाठी 11 कोटीपर्यंत बोली लावली होती. त्यानंतर यामध्ये सीएसके उडी घेतली होती. लिलाव रंगात असताना पंजाब किंग्सने लिलावात उडी घेऊन सॅम करनला आपल्या संघामध्ये सामील केले. पंजाबने तब्बल 18.50 कोटीमध्ये सॅम करनला विकत घेतले आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये सॅम करन ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला होता. त्यामुळे या आयपीएल लिलावामध्ये प्रत्येक संघाचे लक्ष त्याच्याकडे होते. आयपीएल लिलावामध्ये सर्वात महाग खेळाडू ठरल्यानंतर सॅम करन एक मोठं वक्तव्य केलं आहे. स्टार स्पोर्ट्स सोबत बोलताना सॅम करनने आयपीएल लिलावाबाबत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंजाब किंग्जमध्ये परतल्यानंतर सॅम करन (Sam Curran) ने केलं मोठं वक्तव्य,

स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाईव्ह सोबत बोलताना सॅम करन म्हणाला की,”काल रात्री मला झोप लागली नाही. कारण आयपीएल लिलावासाठी मी उत्साहीत होतो. तसेच मी लिलावाबद्दल खूप चिंताग्रस्त होतो. पण मी या लिलावामध्ये यशस्वी झालो आहे. त्यामुळे मी खूप भारावून गेलो आहे. लिलावामध्ये जे काही घडलं त्याची मला कधीच अपेक्षा नव्हती.

सॅम करन यापूर्वीही पंजाब किंग संघाचा भाग होता. याबद्दल बोलताना तो म्हणाला की,”जुन्या संघामध्ये पुनरागमन करणे माझ्यासाठी चांगले ठरू शकते. आयपीएलमध्ये पंजाबसोबत चार वर्षांपूर्वी मी पदार्पण केले होते. म्हणून पंजाबमध्ये परताना मला खूप छान वाटत आहे.” आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्स 6 व्या स्थानावर होता. पंजाबने 14 पैकी 7 सामने जिंकले होते. पण खराब रनरेट असल्यामुळे पंजाब प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. दरम्यान, सॅम करनला संघामध्ये परत घेऊन पंजाबने चांगलीच तयारी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.