InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सॅम पित्रोदा यांनी ‘त्या’ वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे – राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सॅम पित्रोदा यांनी दिल्लीतील 1984 साली घडलेल्या शीख विरोधी दंगलीसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी असे, फेसबुक पोस्ट द्वारे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहिले की, 1984 सालच्या शीख विरोधी दंगल प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे. जे कोणी याला जबाबदार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माझी आई सोनिया गांधी यांनी माफी मागितली आहे. 1984 साली जे घडले ते भयंकर दु:खद होते. असे पुन्हा घडता कामा नये. सॅम पित्रोडा जे म्हणाले ते अयोग्य आहे. मी याबद्दल त्यांच्याशी थेट बोलणार आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे.

तसेच, आपल्या वक्तव्यावर सॅम पित्रोदा यांनी दिलगिरी व्यक्त केली असून,  माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. असे सॅम पित्रोदा म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.