Samana । आपण मोठी क्रांती केली हा शिंदे गटाचा भ्रमाचा भोपळा फुटलाय; सामानातून टीकास्त्र

Samana । मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक म्हणून काम बघत होत्या. दरम्यान, शुक्रवारपासून पुन्हा एकदा सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानंतर आज पहिला अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शुभचिंतन व्यक्त करण्यात आलंय. सध्या एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक व्हावी आणि त्यांना बळ मिळो! अश्या शीर्षकाखाली आजचा आजचा अग्रलेख प्रसिद्ध झालाय.

नेमकं काय म्हटलं आहे सामानाच्या आजच्या अग्रलेखात ?

विधिमंडळातील पक्ष फोडला म्हणजे संपूर्ण पक्ष फुटला असे नाही. शिंदे गटाकडे कायद्याने दोनच पर्याय आहेत. एक तर त्या सर्व लोकांनी राजीनामे द्यावेत व पुन्हा निवडून यावे. दुसरे म्हणजे, या फुटीर गटाने दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावे, असा पेच शिंद्यांपुढे पडला आहे. त्याला त्यांच्या गटातील किती आमदार होकार देतील हा प्रश्नच आहे. पुन्हा मंत्रिपदासाठी त्यांच्या गटात मारामाऱ्या होणार, हेही उघड आहे. त्यामुळे नव्या औषधोपचारासाठी शिंदे हे आजारी पडले असावेत.

शिवसेनेचे ‘धनुष्य बाण’ चिन्ह आम्हालाच मिळेल व आमचीच सेना खरी या त्यांच्या दाव्यातील पोकळपणाही उघड झाला आहे. शिवसेनेच्या धनुष्य बाणावर सध्या कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. त्यातूनही अनेकांना नवे आजार जडू शकतात. एक गोष्ट मान्य केली पाहिजे, शिवसेनेची बाजू सत्याची आहे व 56 वर्षांच्या आयुष्यात शिवसेनेने विश्वासघाताचे असे हलाहल अनेकदा पचवले आहे. त्यामुळे घाव घालणाऱ्यांच्याच तलवारी तुटल्या, असे इतिहास सांगतो.

शिंदे व त्यांच्या गटास हे आता उमजू लागले आहे. आपण फार मोठी क्रांती केली हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. आता सोबतीला खोकी उचलणारे हवशे-नवशे-गवशे आहेत. तेही उद्या राहणार नाहीत. शिवसेनाच खरी, बाकी सर्व धोतऱ्याच्या बिया हे स्पष्टच झाले आहे. शिवसैनिक, शिवप्रेमी जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे. उद्धव ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा आता सुरू होईल व राज्याचा माहोल बदलण्याची क्रिया सुरू होईल. त्यानंतरचा उडालेला धुरळा पाहून आजचा आजार जास्तच बळावेल व कितीही जादूटोणा केला तरी, असं अग्रलेखात म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.